
बारावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात
राज्य बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून, राज्यातील पुरस परिस्थितीमुळे बोर्डाचे काही विभागीय कार्यालयात निकालाचा विलंब झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.
31 जुलै च्या आधी बारावीचा निकाल लावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने आज सीबीएससी बारावी चा निकाल घोषित करण्यात आला. या निकालाला सोबतच राज्य बोर्डाचा हे बारावीचा निकाल लागेल अशी शक्यता होती मात्र शिक्षण विभागाने निकाल जाहीर न करता तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असे सूतोवाच केले. राज्यातील पूरपरिस्थिती गंभीर असूनही परिस्थिती अद्यापही आटोक्यात आली नाही. यामुळे अनेक विभागात निकाल तयार करण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे.